27/06/2022
पुणे - असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या घरकामगार महिला कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची तक्रार करण्यास ठोस पुरावे नसल्यास टाळाटाळ करतात. त्यातही मोठ्या निवासी संकुलामध्ये किंवा हाउसिंग सोसायटीत काम करणाऱ्या महिलांकडून तक्रार नोंदवली जाण्याची शक्यता अधिक असते. मात्र, लैंगिक छळाला सामोरे जावे लागत असून देखील महिला तक्रार करण्यापेक्षा कामाचे ठिकाण बदलणे पसंत करतात, असा निष्कर्ष नुकत्याच एका सर्वेक्षणातून समोर आला आहे.